हे भलतंच कठीण असतं
आणि म्हणूनच बहुतेकांना जमतही नसतं

आपलंच कोणीतरी जवळच असतं
आपलंच कोणीतरी जवळच असतं
तरी लांब राहणं आवश्यक असतं
हे भलतंच कठीण असतं
हे भलतंच कठीण असतं
आणि म्हणूनच…

असतं जग बघत आपल्याला
असतं जग बघत आपल्याला
आपण मात्र कोणालाही बघायचं नसतं
हे भलतंच कठीण असतं
हे भलतंच कठीण असतं
आणि म्हणूनच…

समजत असतं सगळंच सगळ्यांना
समजत असतं सगळंच सगळ्यांना
तरी आपण ना-समजच राहायचं असतं
हे भलतंच कठीण असतं
हे भलतंच कठीण असतं
आणि म्हणूनच …

अर्थ लागत नाहीतच नात्यांचे
अर्थ लागत नाहीतच नात्यांचे
तिसरच कोणीतरी आपलं असतं
हे भलतंच कठीण असतं
हे भलतंच कठीण असतं
आणि म्हणूनच …

कविता करता येत होत्या तेव्हाही
कविता करता येत होत्या तेव्हाही
तरी ‘येत नाहीत ‘ असं सांगत फिरायचं असतं
हे भलतंच कठीण असतं
हे भलतंच कठीण असतं
आणि म्हणूनच …

प्रेरणा कुठली आणि आधार कोण?
प्रेरणा कुठली आणि आधार कोण?
दोन्ही ‘ तू ‘ च हेच कबूल करायचं असतं
हे भलतंच कठीण असतं
हे भलतंच कठीण असतं
आणि म्हणूनच …

1 thought on “हे भलतंच कठीण असतं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *