आठवते मलाही
आपल्यातले सर्व काही
तरी माझ्या कडे तुझी का
एकही आठवण नाही (?)

वेडातच फिरलो, झुरलो
जगतानांच पुन्हा मेलोही
तरी तुझ्या नसण्याचे
ते कौतुक संपत नाही

विस्कटली सगळी चित्रे
फाटली जुनी वहीही
तरी तुझ्या अस्तित्वाचा
लवलेशही दिसला नाही

खोलात मग मनाच्या
उतरून अवखळ प्रवाही
मी गोठवली जीवघेणी
ती काळ रुपी नदीही

तो क्षणही शत्रू झाला
सुटली तुझी मिठीही
भांभावला बघ किती हा
झाला वादळी वाराही

आठवतो का तुला मी (?)
की नुरलो आता जराही (?)
शोधात आठवणींच्या मी
एकटाच तर व्याकूळ नाही (?)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *