सारथी

बरेचदा समुद्रातील प्रचंड वादळ एखाद्या गलबतला उलथवून टाकू शकत नाही पण त्याच गलाबताला एखादा पाण्याचा शांत प्रवाह भरकटवून टाकू शकतो…इतका की ते जहाज पुन्हा आपल्या मार्गाला लागणे अशक्य होऊन बसते. अशा वेळेस महत्त्वाचा ठरतो तो जहाजाचा कप्तान आणि त्याचा स्वतःच्या कामावर आणि अनुभवावर असलेला विश्वास! असे छुपे शांत प्रवाह आधीच ओळखून त्यानुसार आपल्या गलबतावर नियंत्रण ठेवू शकणारा कप्तानच अशा परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो.
जे गलाबताचे तेच विमानाचे, तेच पतंगाचेही आणि तेच माणासाचेही! कित्येकदा आयुष्यातले असे हलके अंतरप्रवाह, शांत झुळुकाच मोठ्या वादळांपेक्षा जास्त भरकटवणारे ठरतात आणि पुन्हा महत्वाचा ठरतो तो कप्तान, सारथी…मग माणूस कोणीही असो तुमच्या माझ्या सारखा कोणी सामान्य माणूस किंवा अगदी पूर्ण पुरुष ‘अर्जुन’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *