सप्रेम नमस्कार!

बर्‍याच दिवसांपासुन घर घेण्याचा विचार मनात होता, शोधाशोधही चालुच होती पण योग काही येत नव्ह्ता!
तुम्हा सर्वांची घरे बघून मनातल्या मनातून फार हेवा वाटत होता, वाटायचे आपलेही असेच एक छानसे घर असावे, जिथे आपल्या मनाल वाटेल तसे वागता यावे, काम करुन थकून घरी आल्यावर मनसोक्त आराम करता यावा, जिथे आपली मते कोणितरि ऐकावी त्यावर प्रतिक्रिया द्यावी …. पण छे हो! कसले काय नि कसले काय?
हे घर काही जमण्याते दिसत नाही आणि मला हवे तसे नाहिच नाहि असे वाटत असतानाच आज अचानकच ह्या भिंती नसलेल्या घराचा पर्याय सुचला आणि माझी गेल्या कित्येक दिवसांची वणवण थांबली!
शेवटी मला हवे तसे घर मिळाले अर्थातच भिंती मात्र नाहित ह्या घराला!
अगदि तुमच्या घ्ररांसारखेच मी देखिल माझे हे घर सजवणार आहे, माझ्या ह्या सजावटीला सुरुवात मात्र मी माझ्याकडे आधीपासुनच असणार्‍या थोड्या सामानापासुन करित आहे.
माझी ही सजावट आवडल्यास आपल्या कौतुकाची थाप पाठीवर पडावी.
धन्यवाद!

1 thought on “सप्रेम नमस्कार!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *