राज्य

ओलांडला उंबरा सुखाचा
राज्यात दुःखाच्या आलो
बघता बघता एव्हाना
इथला सम्राट झालो

इथली घरे दुःखाची
माणसेही दुःखीच
हसऱ्या चेहरऱ्यावरही
गडद लकेर दुःखाचीच

वाढलीत झाडे दुःखाची इथे
दुःखी फांद्या वेड्या-वाकड्या
त्यावर लटकली टपोरी फळे
तीही गोड दुःखाचीच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *