फरक असण्या-नसण्यातला

असण्या-नसण्यातला फरक समजायला जरा वेळ लागतो
कोणी अगदी जीवाचा त्यासाठी परका व्हायला लागतो
कसे स्पष्टच सांगावे तुला खरे काय ते?
ह्या विचारात दिवस-रात्र स्वतःशीच भांडायला लागतो
आपल्या दोघांमध्ये तसले काही नव्हतेच मुळी
असे काहीतरी मी हळू आवाजात म्हणायला लागतो
ठरवूनच मांडतो मी शब्द असे क्लिष्ट, विचित्र
न जाणो अर्थ त्याचाही कसा नेमका तुला कळायला लागतो?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *