जखम

तुझ्या नसण्याची एव्हाना सवय व्हायला हवी होती…
भळभळणारी जखम खोल ती बरी व्हायला हवी होती…
न जाणो कसे काढते मी दिवस हे तुजवीण
इतका त्रास व्हायला ती गोष्ट तरी कुठे नवी होती??
प्रेमात होते तुझ्या म्हणून थोडे तरी जगू शकले
नाहीतर माझीच मी मला तरी कुठे हवी होती…
तू नव्हतासच माझा कधी ओळखू नाहीच शकले मी
पण ही जाणीव जरा आधीच व्हायला हवी होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *