काहीबाही

तुझ्या प्रश्नाचे नव्हतेच उत्तर
म्हणूनच म्हटले बोलूया नंतर…
उगीच सांगून काहीबाही
का वाढवावे आपल्यातील अंतर ?
वळून जाता माघारी तू
दे प्रश्नाचे माझ्याही उत्तर…
भाळलो तुझ्यावर दुरूनच मी
लावलतेस तू कोणते अत्तर ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *