ओझे

…आयुष्यातल्या काही न टाळता आलेल्या (मी जाणूनबुजून ‘न टाळता येणाऱ्या’ लिहायचे टाळले आहे) गोष्टींचे ओझे कधीकधी इतके बोजड वाटते की समर्थ खांदेही ते पेलण्यास असमर्थ वाटू लागतात…इतके जड होते सगळेच की नुसते पेलणेही शक्य होत नाही त्यामुळे ते घेऊन पुढची वाटचाल करणे तर अशक्यच!
अशा वेळी माणसाने सगळे भावनिक बंध झुगारून ते ओझे वेळीच दूर सारले पाहिजे नाही तर त्याच्याखाली दबून माणसातल्या माणूसपणाचा मृत्यू अटळ ठरतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *