असा ‘मी’

समजले ते समजेल तसे
वाटले ते वाट्टेल तसे
घडते जे घडेल तसे
स्वीकारतो मी

कळेल ते कळले तसे
वळेल जे वळले तसे
जळले जे जळले तसे
अनुभवतो मी

जमेल जे जमले तसे
मिळेल जे मिळाले तसे
दिसेल जे दिसले तसे
आचरतो मी

लिहिले जे लिहिले तसे
ऐकेन ते ऐकले तसे
करेन जे केले तसे

मनाचेच मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *